शहर आठ हजारी...!

Foto

आज १५९ पॉझिटिव्ह...

शहरातील कोरोना रुग्णासंख्येने आज ८ हजारांचा आकडा पार केला. नव्या १५९ रुग्णांसह एकूण रुग्णसंख्या ८१०८ झाली आहे.
आज सकाळी आलेल्या अहवालात परीक्षण केलेल्या १३६१ स्वॅबपैकी १५९ रुग्णांचे (79 पुरूष, 80 महिला) अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात ७९ पुरुष आणि ८० महिलांचा समावेश आहे. त्यामुळे आतापर्यंत ८१०८ कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यापैकी ४४६३ बरे झाले. तर ३४३ जणांचा मृत्यू झाला. तर सध्या ३३०३ जणांवर उपचार सुरु आहेत. 

शहरातील ११२ रुग्ण

आज सकाळी शहरात ११२ रुग्ण आढळून आले. त्यात नक्षत्रवाडी २, एन अकरा, सिडको २, हर्सूल कारागृह परिसर १, मुकुंदवाडी १, कांचनवाडी १, इतर २, रामनगर,चिकलठाणा १, पडेगाव ३, विद्यापीठ गेट परिसर १, उथर सोसायटी हर्सुल २, नवनाथनगर ७, नवजीवन कॉलनी २, रेणुका माता मंदिर परिसर १, राजे संभाजी कॉलनी २, रामनगर ६, छावणी ६, एन अकरा हडको ३, हर्सुल १, बाबर कॉलनी १, शिवशंकर कॉलनी ८, रत्नाकर कॉलनी, स्टेशन रोड १, प्रियदर्शनीनगर, गारखेडा १, प्रगती कॉलनी १, एन बारा, हडको १, किराणा चावडी १, कोकणवाडी २, काल्डा कॉर्नर १, ज्योतीनगर १, द्वारकापुरी १, पडमपुरा १, जयसिंगपुरा १, श्रद्धाकॉलनी १, हनुमाननगर १, शनिमंदिराजवळ, अदालत रोड १, मीरानगर, पडेगाव १, गजानननगर १, विष्णूनगर ९, दौलताबाद टी पॉइंट परिसर ३, एन नऊ सिडको १, एन सहा सिडको ७, हनुमाननगर २, माऊलीनगर, हर्सुल १, हिमायतबाग २, आदर्श कॉलनी, गारखेडा १, रामकृष्णनगर, गारखेडा १, उल्कानगरी २, जयभवानीनगर १, नारेगाव ३, अरिहंतनगर १, लॉयन्स हॉस्पीटल परिसर २, पुंडलिकनगर ३, बजाज सोसायटी सातारापरिसर १, ठाकरेनगर, सातारा परिसर १, माऊली नगर १ या भागातील रुग्ण आढळून आले आहेत.

ग्रामीण भागात ४७ रुग्ण

ग्रामीण भागात ४७ रुग्ण आढळून आले. त्यात पैठण १, वाळूज, गंगापूर ५, अजबनगर, वाळूज १, सहारा सिटी, सिल्लोड ३, अंधारी सिल्लोड १, मारवाड गल्ली, लासूरगाव २, जनकल्याण मार्केटनगर, बजाजनगर १, बसवेश्वर चौक, बजाजनगर ३, आनंदजनसागर कार्यालयाशेजारी, बजाजनगर २, सिद्धीविनायक मंदिराशेजारी, बजाजनगर १, आयोध्यानगर, वडगाव कोल्हाटी २, फुलेनगर, पंढरपूर १, नेहा सोसायटी बजाजनगर १, शिवालय चौक, बजाजनगर १, संत एकनाथ शाळेजवळ, चित्तेगाव, पैठण ७, चिंचाळा, पैठण ३, वरूडकाझी १, सावंगी ४, तेली गल्ली, संभाजी चौक, फुलंब्री ४, विवेकानंद कॉलनी, फुलंब्री १, एनएमसी कॉलनी, वैजापूर २ या भागातील कोरोनाबाधित आहेत.